१.

मार्च २६-एप्रिल १, २०२२

उत्पत्ति

शब्बाथ दुपारी

मार्च २६

ह्या आठवड्यासाठी अभ्यास : स्तोत्र १००:१-३, उत्पत्ति १, उत्पत्ति २, निर्गम २०:८-११, निर्गम ४०:३३, मत्तय २५:१४-३०, मत्तय १९:७-९.

सुवर्णवचन : “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली” (उत्पत्ति १:१).

 

આદિએ ઈશ્વરે આકાશ તથા પૃથ્વી ઉત્પન્‍ન કર્યા.

 

उत्पत्तिचे पुस्तक आणि या कारणासाठी, संपूर्ण बायबल देवाच्या उत्पत्तिच्या कृतीने आरंभ होते. ही वास्तविकता अतिशय महत्त्वाची आहे कारण याचा अर्थ आमची उत्पत्ति मानवी आणि बायबलच्या इतिहासाच्या प्रारंभाचे चिन्ह आहे. हे सत्य सूचित करते की उत्पत्तिच्या पुस्तकातील उत्पत्तिची गोष्ट तीच ऐतिहासिक सत्यता आहे जी मानवप्राणी व बायबलचा इतिहास याच्या इतर घटनांना आहे.

उत्पत्ति १ आणि २ यामधील उत्पत्तिची दोन वचनें यांत देव आणि आणि मानवप्राणी याविषयीच्या धड्यांनी भरली आहे. या आठवडी आपण अभ्यास करीत असताना, आपणास अधिक चांगल्या प्रकारे सातवा-दिवस शब्बाथ याचा खोलवर अर्थ समजेल. आपण मानवास त्याच्या प्रतिरूपांत उत्पन्न केले या कृतीवर मनन करणार आहोत, आणि मातीमधून देखील. बरे आणि वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाविषयीची गुप्त मसलत आणि त्याचा जीवन झाडाशी असलेला संबंध याद्वारेही.

सुरूवातीच्या बायबलच्या गोष्टींचा सर्वांत महत्त्वाचा धडा म्हणजे कृपेवरचा धडा. आमचे अस्तित्व ही पूर्णपणे कृपेची कृती आहे. देवाने आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली त्यावेळी मानवप्राणी उपस्थित नव्हता. ज्याप्रमाणे आमची उत्पत्ति होती, आमचे तारण आहे, ही देखील देवापासूनची देणगी आहे. आणि हे किती सत्य आहे की या दोन्ही संकल्पना, उत्पत्ति आणि तारण, सातवा-दिवस शब्बाथ या वचनाच्या आज्ञेमध्ये अस्तित्वांत आहेत.

रविवार

मार्च २७

उत्पत्तिचा देव

स्तोत्र १००:१-३ वाचा. उत्पत्तिच्या देवाला मानवाचा प्रतिसाद काय आहे आणिका ?

उत्पत्ति १ मध्ये, उत्पत्तिच्या वृत्तांताचा पहिला संदेश “देव” हा आहे. आपणास हे भाषांतरात ऐकण्यास मिळते : “प्रारंभी देवाने” (उत्पत्ति १:१). पहिल्या ओळीमध्ये (उत्पत्ति १:१), “देव” हा शब्द वचनाच्या मध्ये टाकण्यात आला आहे आणि त्याला जोरदारपणाच्या ढंगाने (लकब) अधोरेखित करण्यात आला आहे जो इब्री साहित्यात आहे, किंवा पुन्हा पुन्हा म्हणायचा शब्द, ज्याद्वारे देवाच्या महत्त्वावर जोर देण्यात येईल. मग, उत्पत्तिच्या वचनाची सुरूवात, देवावर जोर देऊन होते, जो उत्पत्तिचा लेखक आहे.

उत्पत्तिच्या पुस्तकाची सुरूवात, खरे पाहिले असता, देवाच्या दोन वेगवेगळ्या सादरीकरणाने होते. पहिला उत्पत्तिचा वृत्तांत (उत्पत्ति १:१- २:४) हा देव मानवापासून अतिशय दूर आहे असे सादर करतो, ज्याच्यापर्यंत आपण कधीही पोंहचू शकत नाही असा देव, ईलोहिम, ज्याचे नांव देवाच्या श्रेष्ठतेविषयी बोलते. ईलोहिम हे नांव त्याचे अधिपत्य आणि सामर्थ्य दाखविते, आणि ईलोहिम या शब्दाच्या वापराचा बहुवचनी आकार त्याचे वैभव व अलौकिकता या कल्पनेस सादर करते.

दुसरा उत्पत्तिचा वृत्तांत (उत्पत्ति २:४-२५) देवाला अतिशय जवळ आणि वैयक्तिक असा सादर करतो, सर्वव्यापी देव याव्हे, त्याचे नांव पुष्कळ असा विश्वास ठेवतात की ते जवळीक व संबंध दखवितात. मग उत्पत्तिचे वचन सर्वार्थाने हे की पूर्ण जिवाने देवाची उपासना करण्याचे आवाहन आहे; एक, देवाच्या अमर्याद वैभव आणि सामर्थ्य याविषयी जाणीव असू द्या, आणि त्याचवेळी आमचे त्याच्यावरचे अवलंबत्व याची आठवण ठेवा कारण त्याने आम्हांस उत्पन्न केले “आणि आपण स्वत:चे नाही” (स्तोत्र १००-३). आणि म्हणून पुष्कळशी स्तोत्रे अनेकवेळा उत्पत्तिला उपासनेशी जोडतात (स्तोत्र ९५:१-६; स्तोत्र १३९:१३,१४ (प्रकटी १४:७ बरोबर तुलना करा))

हा देवाविषयीचा दुहेरी दृष्टिकोण दोन्ही वैभवी आणि सामर्थ्यशाली, आणि जो अतिशय जवळ, प्रेमळ आणि जो आपल्या बरोबर संबंध निर्माण करतो, तो महत्त्वाचा मुद्दा निर्माण करतो आम्ही उपासनेमध्ये देवाकडे कसे जाव, आदर आणि गंभीरता ही आनंद आणि देवाचे सान्निध्य क्षमाशीलता, व प्रीति याच्या आशवासनाबरोबर जाते (स्तोत्र २:११ पाहा). देव अर्थपूर्ण आहे या दोन्ही सादरीकरणाचे अनुक्रम देखील असेच आहेत : देवाच्या सान्निध्याचा अनुभव आणि त्याच्या वास्तव्याची जवळीक आपल्यापासून दूर असलेल्या देवाचा अनुभव देतात. जेव्हा आपणास देव किती महान आहे याची जाणीव होते तेव्हाच आपण त्याच्या कृपेची योग्यता ओळखतो आणि आपल्या भयप्रद स्थितीमध्ये तिचा उपभोग घेतो, त्याचे अद्भुत आणि प्रेमळ वास्तव्य आमच्या जीवनांत आहे.

देवाच्या अमर्याद सामर्थ्याविषयी विचार करा, ज्याने विश्व उचलून धरले आहे, आणि तरीही आमच्या प्रत्येकाच्या इतके जवळ आहे. हे आश्‍चर्यकारक सत्य इतके आश्‍चर्यकारक का आहे ?

सोमवार

मार्च २८

उत्पत्ति

उत्पत्ति १:४,१०,१२,१८,२१,२५,३१ आणि उत्पत्ति २:१-३ वाचा. “हे सर्व बहुत चांगले आहेया उत्पत्तिच्या पहिल्या वृत्तांताचे महत्त्व काय आहे ? उत्पत्तिच्या शेवटल्या भागात (उत्पत्ति २:१-३) सूचित धडा कोणता आहे ?

उत्पत्तिच्या वृत्तांताच्या प्रत्येक पायरीवर, देव आपल्या कार्याचे मूल्यमापन करतो tov “चांगले” म्हणून. सर्वसामान्यपणे असे समजले जाते की हे विशेषण म्हणजे देवाचे उत्पत्तिचे कार्य यशस्वी झाले आणि देवाचे निरीक्षण हे की “हे सर्व बहुत चांगले आहे” म्हणजे “सर्वकाही व्यवस्थित झाले आहे.” “प्रकाश झाला (उत्पत्ति १:४), फळझाडे फळें देत होती (उत्पत्ति १:१२), आणि असेच सर्वकाही.

परंतु हा शब्द कार्याच्या कार्यक्षमतेपेक्षा अधिक सूचित करतो. इब्री शब्द हा (०५ देखील बायबलमध्ये सौंदर्यशास्त्र विषयक गोष्टींचे कौतुक करण्यासाठी वापरण्यात आला आहे (उत्पत्ति २४:१६). याचा वापर दुष्टाई याच्या विरूद्धही करण्यात आला आहे (उत्पत्ति २:९). ज्याचा संबंध मरणाशी आहे (उत्पत्ति २:१७).

“हे सर्व बहुत चांगले आहे” हा वाक्‌प्रचार म्हणजे उत्पत्तिचे कार्य चांगले चालले होते, की ते सुंदर व परिपूर्ण होते, आणि त्यांत कोणतीही दुष्टाई नव्हती. जग “आता पर्यंत” जसे आता आपले आहे तसे नव्हते, पाप आणि मरणाने बाधित झालेले, ही कल्पना उत्पत्तिच्या दुसऱ्या वृत्तांताच्या सुरूवातीला खात्रीपूर्वक सांगण्यात आली (उत्पत्ति २.५ पाहा).

उत्पत्तिचे वर्णन मूलभूतपणे उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतास विरोध करते, जी आग्रहीपणे घोषणा करते की जग हळूहळू स्वत:च विकसित होत गेले ज्याद्वारे एकापाठोपाठ अपघाती घटना घडल्या, याची सुरूवात अगदी आतील स्थितीतून आणि ती श्रेष्ठ गोष्टीकडे विकसित होत गेली.

या उलट, बायबलचे लेखक खात्रीलायकपणे सांगतात की देवाने हेतुपूर्वक आणि अचानकपणे जगाची उत्पत्ति केली (उत्पत्ति १:१). असे काहीही घडले नाही किंवा आपोआप घडले नाही किंवा तसे त्याविषयी काहीही नव्हते. हे जग स्वत:च अस्तित्वांत आले नाही तर ही केवळ देवाची इच्छा आणि शब्दाचा परिणाम होता (उत्पत्ति १:३). बारा (bara) “उत्पन्न” हे क्रियापद, याचे भाषांतर उत्पत्ति १ मध्ये प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही “उत्पन्न’ केली, त्याची प्रजा म्हणून हे केवळ देवाबरोबरच होऊ शकते, आणि ते आकस्मितपणा दर्शविते : देव बोलला, आणि तसे झाले.

उत्पत्तिचे वचन आम्हांस माहिती देते की “सर्वकाही” तेव्हा करण्यात आले (उत्पत्ति १:३१), आणि स्वत: उत्पन्नकर्त्याच्या इच्छेप्रमाणे, ते सर्व “चांगले आहे” हे मान्य करण्यात आले (उत्पत्ति १:३१). उत्पत्ति १:१ म्हणजे आकाश आणि पृथ्वी यांची उत्पत्ति स्वत: याची घटना; आणि उत्पत्ति २:१ घोषित करते घटना घडली आहे. आणि ते सर्वकाही पूर्ण करण्यात आले, त्यात शब्बाथाचा समावेश आहे, सात दिवसांमध्ये.

लाखों वर्षांच्या उत्क्रांतिवादाची कल्पना उत्पत्तिच्या गोष्टीला का पूर्णपणे नाहीसे करते ? दोन्ही दृष्टिकोण कसेही पाहिले असता सुसंवादाने एकत्र का राहू शकत नाहीत ?

मंगळवार

मार्च २९

शब्बाथ

उत्पत्ति २:२, ३ आणि निर्गम २०:८-११ वाचा. सातवा दिवस शब्बाथ हा उत्पत्तिशी का संबंधित आहे ? हा संबंध आपण शब्बाथ कसा पाळतो यावर कसा प्रभाव टाकतो ?

हे अगदी तंतोतंत आहे कारण “देवाने आपले उत्पत्तिचे कार्य संपविले” आणि शब्बाथाची स्थापना केली. म्हणून, सातवा दिवस शब्बाथ, हा आमच्या विश्वासाचा भावार्थ आहे की देवाने आपले कार्य संपविले, आणि त्याने पाहिले की “सर्व चांगले आहे”. शब्बाथाचे पालन करणे म्हणजे देवाबरोबर एकत्र येऊन त्याच्या उत्पत्तिचे मोल आणि सुंदरता ओळखणे.

आपण देखील आपल्या कामातून विश्रांती घेऊ शकतो जशी देवाने आपल्या कामातून घेतली. शब्बाथाचे पालन करणे म्हणजे देवाच्या हे “सर्व चांगले आहे” या उत्पत्तिस होय म्हणणे आहे, ज्यामध्ये आमच्या शारीरिक शरीराचा समावेश आहे. काही पुरातन (आणि आधुनिक) विश्वासाप्रमाणे, पवित्रशास्त्रामध्ये असे काहीच नाही, जुन्या किंवा नव्या करारात, जे शरीरास दुष्ट आहे म्हणून कमी लेखते. तो एक विधर्मी विचार आहे, बायबलचा नाही. त्या ऐवजी, शब्बाथ पालन करणारे देवाच्या उत्पत्तिबद्दल आभारी आहेत – ज्यांत त्यांच्या स्वत:च्या मांसाचा समावेश आहे – आणि म्हणून ते उत्पत्तिचा आनंद उपभोगतात आणि त्याची काळजी वाहतात.

शब्बाथ, जो मानवी इतिहासाच्या पहिल्या “शेवटास” चिन्हांकित करतो, आणि ते दु:ख भोगणाऱ्या मानवजातिसाठी आणि विव्हळणाऱ्या जगासाठी आशा आहे. “कार्य संपविले” हा वाक्‌प्रचार मनोरंजक आहे कारण तो आपल्याला निवासमंडप बांधल्यानंतर शेवटी पुन्हा दिसतो (निर्गम ४०:३३) आणि नंतर पुन्हा शलमोनाचे मंदिर बांधल्यानंतर दिसतो (वराजे ७:४०,५१) – दोन्ही ठिकाणी शुभवर्तमान आणि तारण यांचा धडा शिकविण्यात आला.

पतनानंतर, शब्बाथ, आठवड्याच्या शेवटी, तारणाच्या चमत्काराकडे निर्देश करतो, जो केवळ नवीन उत्पत्तिच्या चमत्काराद्रवारेच घडेल (यशया ६५:१७, प्रकटी २१:१). आमच्या मानवाच्या आठवड्याच्या शेवटी शब्बाथ हे एक चिन्ह आहे की जेव्हा या जगाचे दु:ख आणि त्रास यांचा शेवट होईल.

आणि म्हणून येशूने आजाऱ्याला बरे करण्यासाठी अगदी योग्य अशा शब्बाथाची निवड केली (लूक १३:१३-१६). ज्या काही प्रथेमध्ये पुढारी अडकले होते त्याविरूद्ध, शब्बाथ दिवशी बरे करण्याद्वारे येशूने लोकांना दाखविले, आणि आम्हांलाही, की जेव्हा सर्व वेदना, सर्व दु:ख, सर्व मरण, संपुष्टात येईल, जे तारणाच्या प्रक्रियेसाठीचा अंतिम सारांश असेल. म्हणून, प्रत्येक शब्बाथ आम्हांस तारणाच्या आशेकडे निर्देश करतो.

शब्बाथ दिवशी विश्रांती घेण्याद्रारे, आपण विश्रांती आणि तारण याचा अनुभव कसा घेतो जो आम्हांस आता येशूमध्ये आहे, आणि जो शेवटी पूर्ण केला जाईल, जेव्हा नवे आकाश व नवी पृथ्वी यांची उत्पत्ति केली जाईल.

बुधवार

मार्च ३०

मानवाची उत्पत्ति

मानवाची उत्पत्ति ही देवाच्या उत्पत्तिची शेवटची कृती होती, उत्पत्तिच्या वृत्तांतामध्ये तशी शेवटचीच. मानव हे संपूर्ण पृथ्वीवरील उत्पत्तिचा कळस होते, त्याच हेतुसाठी पृथ्वीची उत्पत्ति करण्यात आली होती.

उत्पत्ति १:२६-२९ आणि उत्पत्ति २:७ वाचा. मानवाच्या उत्पत्तिच्या बाबतीत या दोन वेगवेगळ्या संबंधामध्ये काय फरक आहे ?

देवाने मानवाला त्याच्या स्वत:च्या प्रतिरूपांत उत्पन्न केले आहे हे बायबलचे एक धाडशी विधान आहे. केवळ मानवालाच देवाच्या प्रतिरूपांत निर्माण केले आहे. “जरी देवाने पृथ्वीवरील सर्व प्राणी निर्माण केले” (उत्पत्ति १:२५), “ देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपात निर्माण केले” (उत्पत्ति १:२७). हे सूत्र बहुतेकवेळेस मानवाच्या आध्यात्मिक स्वभावापुरते मर्यादित आहेत, याचा अर्थ असा की “देवाच्या प्रतिरूपात” म्हणजे हे समजून दर्शविणे की देवाला सादर करण्यासाठी केवळ प्रशासकीय कार्य दाखविणे, किंवा देवाबरोबरच्या किंवा एकमेकांबरोबरच्या संबंधाचे आध्यात्मिक कार्य.

त्याचवेळी जरी समज बरोबर असले, तरी ते उत्पत्तिच्या वास्तविकतेचे महत्त्व याचा समावेश करण्यात अपयशी ठरले. दोन्ही परिणामांचा समावेश दोन शब्दांत करण्यात आला आहे “प्रतिरूपाचा” आणि “आपल्या सदृश”, या दोन्ही प्रक्रियेचे वर्णन उत्पत्ति १:२६ मध्ये केले आहे. त्याचवेळी इब्री शब्द सेलेम (tselem), “प्रतिरूप शरीराच्या भक्कम आकारासाठी याचा उल्लेख केला आहे, “सदृश” (demut) हा शब्द दैवी व्यक्तिच्या तुलनात्मक अमूर्त गुणांचा उल्लेख करतो.

म्हणून, “देवाने प्रतिरूपात” हे हिब्रू मत हे मानवी स्वभाव यास बायबलच्या संपूर्ण दृष्टिकोणातून समजून घ्यावयास हवे. बायबलची वचनें याची खात्री देतात की मानवी व्यक्ति (पुरूष आणि स्त्रिया) यांना देवाच्या प्रतिरूपात शारीरिकरीतीने आणि आध्यात्मिकरीतीने निर्माण केले आहे. जसे एलन जी. व्हाईट स्पष्टपणे भाष्य करतात : जेव्हा आदाम उत्पन्नकर्त्याच्या हातांतून आला, तेव्हा त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक गुण होता, उत्पन्नकर्त्याशी सदृष्य असा.”-एज्युकेशन, पान १५.

वास्तविक पाहाता, देवाच्या प्रतिरूपाला संपूर्णपणे समजणे, ज्यांत शरीराचा समावेश आहे, हे उत्पत्तिच्या वृत्तांतामध्ये पुन्हा खात्रीलायकरीतीने सांगण्यात आले आहे, जे म्हणते की, “तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला” (उत्पत्ति २:७), खरोखर, “जीवधारी प्राणी” नेफेश (nefesh) , दोन दैवी कृतींचा परिणाम : देवाने “घडिला” आणि देवाने “फुंकला”. लक्ष द्या की “फुंकला” याचा उल्लेख बहुतेकवेळेस आध्यात्मिक परिणाम दाखविण्यासाठी होतो. परंतु हे अतिशय घट्टपणे श्वासोच्छ्वासाच्या जीवशास्त्रीय क्षमतेशी जोडला गेला आहे, मनुष्याचा जो भाग मातीतून “निर्माण” केला होता.” तो “जीवनाचा श्वास” आहे; म्हणजे, श्वास (आध्यात्मिक) आणि जीवन (शारीरिक).

नंतर देवाने तिसरी शस्त्रक्रिया केली, यावेळेला मनुष्याच्या शरीरामधून स्त्रीला निर्माण करण्यासाठी (उत्पत्ति २:२१,२२), म्हणजे एकप्रकारे यावर जोर देण्यासाठी की ती देखील मनुष्याच्या स्वभावासारखीच आहे.

गुरूवार

मार्च ३१

मानवजातीचे कर्तव्य

देवाने पहिल्या मनुष्यास उत्पन्न केल्याबरोबर, त्याने त्याला तीन देणग्या देऊ केल्या : एदेन बाग (उत्पत्ति २:८), अन्न (उत्पत्ति २:१६), आणिस्त्री (उत्पत्ति २:२२).

उत्पत्ति २:१५-१७ वाचा. उत्पत्ति आणि देव यांच्याकडे मनुष्याचे कर्तव्य काय आहे ? ही दोन्हीही कर्तव्य एकमेकांशी कशी संबंधित आहेत ?

 मनुष्याचे पहिले कर्तव्य नैसर्गिक वातावरण आहे ज्यात देवाने त्याला ठेवले होते. “मशागत आणि राखण करण्यास ठेविले” (उत्पत्ति २:१५). अवाड (avad) हे क्रियापद “मशागत” कामाचा उल्लेख करते. केवळ देणगी मिळणेच पुरेस नाही. आम्हांस त्यावर काम करून ते फलद्रूप करावयास हवे – एक धडा जो येशू त्याच्या रूपयांच्या दृष्टांतामध्ये पुन्हा एकदा पुनरावृत्ती करणार आहे (मत्तय २५:१४-३०). शमार (shamar), “राखण करणे” हे क्रियापद एक जबाबदारी सूचित करते की जे मिळाले आहे ते टिकवून ठेवणे.

दुसरे कर्तव्य त्याच्या अन्नाविषयी (आहाराविषयी) आहे. आपण हे ध्यानांत ठेवले पाहिजे की देवाने ते मानवास दिले आहे (उत्पत्ति १:१९ पाहा). देव आदामास हे देखील म्हणाला की “झाडाचे फळ येथेच्छ खा” (उत्पत्ति २:१६). मानवाने झाडें उत्पन्न केली नाहीत – किंवा त्यावर असणारे अन्न. त्या देणग्या होत्या, कृपेच्या देणग्या.

परंतु येथे एक, आणखी आज्ञा आहे : त्यांनी देवाची मुबलक देणगी मिळवावयाची होती आणि तिचा आस्वाद घ्यावयाचा होता “वाटेल त्या झाडाचे.” या कृपेच्या भागाला, देवाने एक निर्बंध घातला होता. त्यांनी एक विशिष्ट झाडाचे फळ खावयाचे नव्हते. निर्बंधाशिवाय आनंद उपभोगणे मरणाकडे नेणार होते. हे तत्त्व अगदी एदेन बागेपासून आहे, आणि पुष्कळ प्रकारे हेच तत्त्व आजही अस्तित्वांत आहे.

मनुष्याचे तिसरे कर्तव्य स्त्रीविषयी आहे, देवाची तिसरी देणगी : “यास्तव पुरूष आपल्या आईबापांस सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील” (उत्पत्ति २:२४). हे असाधारण विधान एक जोरदार व्यक्तत्व आहे जे वैवाहिक कराराकडे मानवाची जबाबदारी ठळकपणे दखविणे आणि ती “एकदेह होतील” याचा हेतु दर्शविणे, याचा अर्थ एक व्यक्ति (मत्तय १९:७-९ बरोबर तुलना करा).

याचे कारण मनुष्य (पुरूष) (स्त्री नव्हे) ज्याने आपल्या आईबापांस सोडावे आणि याचा संबंध बायबलमधील पुरूषी वंशावळीप्रमाणे उपयोग करावा; म्हणून कदाचित, ही आज्ञा स्त्रीला देखील लागू आहे. कोणत्याही प्रकारे, विवाहाचे बंधन, जरी देवाकडून देणगी असली, तरी ती एकदा का देणगी मिळाली की मानवाची जबाबदारी आवश्यक करते, ही जबाबदारी विशवासूपणे पार पाडणे हे पुरूष आणि स्त्री या दोघांवरही अवलंबून असते.

देवाने तुम्हांला जे काही दिले आहे त्याविषयी विचार करा. तुम्हांला जे देण्यात आले आहे त्याबद्दल तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत ?

शुक्रवार

एप्रिल १

अधिक विचार : एलन जी. व्हाईट यांचे, “सायन्स अँड द बायबल,” पानें १२८, १२९, इन एज्युकेशन; “द क्रियेशन,” इन द स्टोरी ऑफ रिडम्पशन, पानें २१, २२ वाचा.

जरी निसर्गाचे पुस्तक आणि प्रकटीकरणाचे पुस्तक यावर एकाच कल्पकतेने आखणी करण्याचा प्रभाव आहे, ते सर्व सुसंगतपणे बोलतात. वेगवेगळ्या भाषेमध्ये, ते सर्व त्याच महान सत्याची साक्ष देतात. विज्ञान नवीन अद्‌भुत गोष्टींचा शोध लावते ; परंतु ते आपल्या शोधांमधून असे काही आणीत नाही, जे योग्यरीतीने समजेल, दैवी प्रकटीकरणाबरोबर त्याचा संघर्ष असतो. निसर्गाचे पुस्तक आणि लिखित वचन एकमेकांवर प्रकाश टाकतात. ते आमची देवाबरोबर ओळख करून देतात आणि आम्हांस नियमशास्त्राविषयी काहीतरी शिकवितात ज्याद्वारे तो कार्य करतो.

निसर्गामध्ये निरीक्षण केलेल्या वास्तविकतेपासून चुकीचे निष्कर्ष काढले जातात, तरीही, ते विज्ञान आणि प्रकटीकरण यातील संघर्षास कारणीभूत ठरतात; आणि सुसंगतपणा आणण्याचा प्रयत्न करीत असताना, पवित्रशास्त्राचा अर्थ घेतला जातो जो देवाच्या वचनाचा जोर हळूहळू कमी (क्षीण) करून त्याचा नाश करतो. भूरचनाशास्त्र मोशेच्या उत्पत्तिच्या वृत्तांताच्या खऱ्या अर्थास विरोध करते. लाखों वर्षे, असा दावा करण्यात येतो की, गोंधळाच्या स्थितीतून पृथ्वीची उत्क्रांति होण्यासाठी इतक्या वर्षांची गरज होती; आणि या विज्ञानाच्या प्रकटीकरणाला गृहीत धरून त्यात बायबलसाठी जागा बनविण्यासाठी, उत्पत्तिचे दिवस फार विशाल आहेत असे गृहीत धरले, अमर्याद काल, ज्याची व्याप्ती हजारों किंवा लाखों वर्षांची दाखविली जाते.

असा सारांश संपूर्णपणे अनाहूत आहे. बायबलची नोंद स्वत:शीस सुसंगत आहे आणि निसर्गाच्या शिकवणीशीही.” – एलन जी. व्हाईट, पानें १२८, १२९.

चर्चेसाठी प्रश्‍न :

१) जर आपण विश्वास ठेवतो की या सुरूवातीच्या (प्रारंभीच्या) गोष्टी आख्यायिका “दंतकथाआहेत तर त्याचा परिणाम आमच्या विश्वासाची प्रत यावर का व्हावा, ज्याची रचना आवश्यकरीतीने आम्हांस आध्यात्मिक धड्यांमध्ये सूचना देण्यासाठी करण्यात आली आहे परंतु ऐतिहासिक वास्तविकतेशिवाय ? बायबलच्या वचनांमध्ये असे काय संकेत मिळतात जे सूचित करतात की बायबलच्या लेखकांना ठाऊक होते की ते “ऐतिहासिक” आहेत ज्याप्रमाणे इतर सर्व गोष्टी उत्पत्तिच्या पुस्तकात आहेत ? या ऐतिहासिक गोष्टींच्या सत्याविषयी येशूची साक्ष काय आहे ?

२) पृथ्वीच्या कारभारीपणाविषयीचे महत्त्व याविषयी उत्पत्तिमधील गोष्टी आम्हांस काय शिकवितात ? आपण आपल्या ग्रहाचे चांगले कारभारी कसे व्हावे, त्याचवेळी, उत्पत्तिचीच उपासना करणे या धोक्यापासून दूर राहावे, जे उत्पन्नकर्त्याच्या विरूद्ध आहे, हा खरोखर अगदी वास्तविक मोह आहे ? (रोम १:२५ पाहा.)

३) हजारों दीर्घ वर्षांच्या पापाने केलेल्या नाशानंतर देखील, कोणत्या प्रकारें उत्पत्तिची मूळ अद्‌भुतें आणि सुंदरता आणि वैभव “हे सर्व चांगले आहेहे अद्यापही स्वत: आम्हांस प्रकट करतात, आम्हांस जोरदारप्रकारे देवाचा चांगुलपणा आणि सामर्थ्य याविषयी बोलतात ?